Celina Jaitly Controversy : सेलेना जेटलीवर बोलणं पाकिस्तानी चित्रपट समीक्षकाला पडलं महागात...प्रकरण थेट परराष्ट्र मंत्रालयात

अभिनेत्री सेलेना जेटलीवर कमेंट करणं आता पाकिस्तानी चित्रपट समीक्षकाला चांगलंच महागात पडलं आहे.
Celina Jaitly
Celina JaitlyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

अभिनेत्री सेलिना जेटलीच्या फरदीन आणि फिरोज खान यांच्यासोबतच्या संबंधांवर भाष्य करणे पाकिस्तानी समीक्षकांना चांगलेच महागात पडले. आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सेलिना जेटली हिने तिच्यावर पाकिस्तानी समीक्षकांची केलेल्या असभ्य कमेंट विरोधात आता तक्रार केली आहे. 

सेलेनावर केले होते आरोप

पाकिस्तानी समालोचकाने सेलिना जेटलीचे फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा समीक्षकांनी सेलिना जेटलीबद्दल ट्विट केले तेव्हा अभिनेत्रीनेही त्यांना ट्विट करून चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सेलिना जेटलीने याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती.

महिला आयोग आणि परराष्ट्र मंत्रालय

अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि महिला आयोगापर्यंत पोहोचले. आता परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी कारवाई केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर अभिनेत्रीला दिलेल्या या त्रासाप्रकरणी नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे हे प्रकरण उचलून धरले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सेलेनाने नोट शेअर करत माहिती दिली

खुद्द सेलिना जेटलीने पत्र शेअर करून परराष्ट्र मंत्रालयाच्या कारवाईची माहिती दिली आहे आणि एक लांबलचक नोटही शेअर केली आहे. सेलिना जेटलीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी चित्रपट समीक्षक उमेर संधूने माझ्याबद्दल खोटा दावा केला होता. खरं तर, उमेर संधू स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणवतो आणि ट्विटरवर भारतीय सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारे दावे करत असतो.

Celina Jaitly
Shobana : पुन्हा कामावर घेतलं ;पण एका अटीवर... या अभिनेत्रीने चोरी करणाऱ्या मोलकरणीला केलं माफ

फिरोज खान आणि फरदीन खानचं नाव जोडलं

यासोबतच ट्विट करताना सेलेनाने तिच्या आणि फिरोज खानच्या नात्याबद्दलही लिहिले आहे. सेलीनाने सांगितले की, फिरोज खान माझा गुरू होते आणि माझे फरदीन खानसोबत चांगले संबंध आहेत. अशा आरोपांमुळे मला खूप दु:ख झाले आहे. सेलिना जेटली यांना दिवंगत अभिनेते फिरोज खान यांनी त्यांचा मुलगा फरदीन खान सोबत 2003 मध्ये आलेल्या 'जानशीन' चित्रपटात अभिनयात ब्रेक दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Enemy Property Case Goa
India Rejects Pakistan China Joint Boundary Commission
CDSCO Warning Pakistani Cosmetic Creams
Pakistan England pitch controversy
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com