Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

Rahul Gandhi: तामिळनाडूच्या महिलांचा राहुल गांधींसमोर लग्नाचा प्रस्ताव...

Published on

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. 150 दिवस भारतभर ही यात्रा होणार आहे. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेस ही पदयात्रा करत असून, यादरम्यान काँग्रेस नेते जनतेशी संवाद साधत आहेत. काँग्रेस खासदार जयराम रमेश (MP Jairam Ramesh) यांनी या भेटीशी संबंधित एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) जेव्हा तामिळनाडूतील (Tamilnadu) महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी येथील महिलांनी राहुल गांधींचे तामिळनाडूवर प्रेम असल्याने त्यांचे लग्न एका तामिळ तरुणीसोबत करावी अशी त्यांची इच्छा असल्याचे महिलांनी सांगितले.

Rahul Gandhi
मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्याला विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

जयराम रमेश यांनी याबाबत ट्विट करताना असे म्हटले की, "राहुल गांधी आज दुपारी 'मार्तंडम'मधील मनरेगा महिला कामगारांशी संवाद साधत होते. यावेळी एक महिला म्हणाली, राहुल गांधी यांचे तामिळनाडूवर प्रेम आहे आणि त्यांचे लग्न एका तामिळ मुलीशी करण्याची महिलांची इच्छा आहे. राहुल गांधी यांचा स्मितहस्य करणारा चेहरा सर्वकाही सांगून जाते." असे जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा (Congress Bharat Jodo Yatra) 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांना कव्हर करेल आणि पाच महिन्यांच्या कालावधीत कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर हे 3,750 किमी अंतर पूर्ण करेल. तसेच 22 मोठ्या शहरांमध्ये मेगा रॅली होणार आहे.

Rahul Gandhi
गोव्याच्या खेळाडूंची दुहेरी बॅडमिंटनमध्ये 'Bronze' पदकाची कमाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com