अभिनेते रजनीकांत यांच्या नम्र स्वभावाचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. रजनीकांत कित्येकदा आपलं स्टारडम विसरून फॅन्समध्ये सर्वसामान्य माणसासारखे मिसळून जातात. वयाची 70 पार झाल्यानंतरही ज्या उत्साहाने ते काम करतात ती उर्जा खरंच वाखाणण्यासारखी आहे. रजनीकांत यांच्या नम्र असण्याचं कौतुक आता बॉलीवूडचा जग्गूदादा म्हणजेच जॅकी श्रॉफने केले आहे. चला पाहुया जग्गू दादा नेमकं काय म्हणाला?
जॅकी श्रॉफने ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांच्यासोबत जेलरमध्ये काम करताना त्यांच्याकडून आलेल्या एका सुखद अनुभवाची आठवण सांगितली आहे. जॅकी दादाने न्यूज18 ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की जेलरच्या शूट दरम्यान रजनीकांत यांनी त्याची माफी मागितली.
या माफीचे कारण सांगताना जॅकी दादाने सांगितले की रजनीकांत शूटींग संपल्यावर जॅकीचा निरोप घ्यायला विसरले आणि बाय म्हणायला विसरले. यामुळे जॅकी भावूक झाला आणि रजनीकांतच्या गोड हावभावामुळे तो जवळजवळ रडला.
जॅकीने न्यूज18 ला सांगितले, “सगळं बदललं असलं तरी रजनीकांत गुरू तसाच आहे. त्यांची नम्रता आणि सर्वांबद्दलचा आदर वर्षानुवर्षे कायम आहे. तो आतापर्यंतचा सर्वात नम्र सुपरस्टार आहे. हिट आणि फ्लॉपच्या पलीकडे त्याचे स्टारडम आहे. त्याच्यासोबत काम करताना अनुभव समृद्ध करणारा असतो. रजनी गरू ही पडद्यावरची खूप वेगळी व्यक्ती आहे.
प्रत्येक वेळी तो चित्रपटात दिसला की त्याच्यात पूर्ण परिवर्तन होते. आणि त्याचे पात्र सोडताच तो तसाच राहतो. त्याची शैली, त्याची चालण्याची पद्धत, बोलणे, दिसणे, तो चष्मा लावून सर्वकाही करतो, त्याच्याकडे जी काही मालमत्ता आहे, मला वाटते की तो हुशार आहे.”
जेलरमध्ये जॅकी श्रॉफ विरोधी भूमिकेत आहे. या अभिनेत्याने यापूर्वी रजनीकांतसोबत 2014 मधील अॅनिमेटेड अॅक्शन फिल्म कोचादईयान आणि 1987 मधील उत्तर दक्षिण चित्रपटात काम केले आहे.
जॅकी - रजनीकांत यांच्या आगामी 'जेलर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रजनीकांतने त्यांची माफी कशी मागितली ही आठवण सांगताना जॅकीने म्हटले, , “मला आठवते की त्याने दिवसभरासाठी त्याचे शूट पूर्ण केले होते आणि तो त्याच्या घरी निघाला होता.
मला अजून काही सीन्स शूट करायचे होते. तो त्याच्या गाडीत बसला होता पण त्याने मला 'बाय' न केल्यामुळेच परत यायचे ठरवले. तो आला आणि म्हणाला, 'मला माफ कर मी तुला निरोप द्यायला विसरलो.
पुढे रजनीकांत म्हणाले जर तुला माझी गरज असेल तर मी थांबतो.' मी जवळजवळ रडत होतो पण माझ्या भावनांना सांभाळलं. ज्या चित्रपटात तो प्रमुख व्यक्तिरेखेत आहे आणि आम्ही पाहुणे कलाकाराची भूमिका साकारली आहे अशा चित्रपटात काम करताना खूप आनंद झाला.
आम्ही जे काही केले आहे, आम्ही त्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला आहे कारण त्याने आमच्यावर प्रेम केले आहे आणि आम्हाला खूप प्रेम आणि आदर दिला आहे. त्याने आपल्या कुटुंबियांप्रमाणे आमची काळजी घेतली."
रजनीकांतच्या जेलरचा अधिकृत ट्रेलर, या ऑगस्टच्या सुरुवातीलाच रिलीज झाला. दोन वर्षात त्याचा पहिला चित्रपट जेलरचा ट्रेलर संपूर्ण अॅक्शन-पॅक मनोरंजनाची हमी देतो. ट्रेलरमध्ये जॅकी श्रॉफची झलकही दिसली कारण तो फोन कॉलवर रजनीकांतला धमकी देतो. जेलरमध्ये राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया आणि विनायकन यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.