बॉलीवूडमधील स्टार्सच्या घटस्फोटाच्या बातम्या आता एक सामान्य गोष्ट बनली आहे आणि आता या यादीत अभिनेता फरदीन खानचे नाव देखील जोडले गेले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक चालले नाही. चर्चा अशी आहे की हे जोडपे विभक्त होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
नताशा माधवानी ही 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध सुपरहिट नायिका मुमताजची मुलगी आहे. तीच मुमताज, जिने राजेश खन्ना ते धर्मेंद्र यांच्यासोबत तिच्या करिअरमधले बरेच चित्रपट केले आहेत. 1974 मध्ये मुमताजने मयूर माधवानीसोबत लग्न केले. या दोघांना तान्या आणि नताशा या दोन मुली आहेत.
'ई-टाइम्स'च्या वृत्तानुसार, फरदीन खान आणि नताशाने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघे वेगळे राहून एक वर्ष झाले. ;पण फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्यात मतभेद कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण आता दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आतापर्यंत या वृत्तांवर फरदीन किंवा नताशा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
याबाबत नताशा आणि फरदीन यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, या क्षणी मला काहीही बोलायचे नाही. फरदीन खान आणि नताशा यांनी 2005 मध्ये भव्य पद्धतीने लग्न केले होते. दोघांचे लग्न आजही इंडस्ट्रीत लक्षात आहे. या दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्स आणि मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. या दाम्पत्याला एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.