पणजी: यंदा इफ्फीच्या निमित्ताने ईएसजी ते कला अकादमी पणजी पर्यंत रोड परेडचे आयोजन करण्यात येणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शिग्मा आणि कार्निवल थीमवर आधारित फ्लोट परेड सादर केला जाईल.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (दि. ४ नोव्हेंबर) रोजी सर्व शासकीय विभागांसोबत राज्यात होणाऱ्या 55व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आढावा घेणारी बैठक घेतली आणि या बैठकीमधून 15 नोव्हेंबरपर्यंत इफ्फीची सर्व कामे पूर्ण होतील व त्यांनतर 18 नोव्हेंबर रोजी पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली.
इफ्फीसाठी यंदा चित्रपटप्रेमी, विद्यार्थी आणि चित्रपट तज्ज्ञांकडून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरू आहे. शनिवार (दि. 2 नोव्हेंबर) पर्यंत महोत्सवासाठी तब्बल 3,659 जणांनी नोंदणी केली. इफ्फीबद्दल अनेकांच्या मनात आकर्षण असते त्यामुळे यावर्षी विक्रमी संख्येने प्रतिनिधींची नोंदणी होण्याची शक्यता आहे.
20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या चित्रपट महोत्सवाची सध्या गोव्यात जय्यत तयारी सुरू आहे. गोवा मनोरंजन संस्थेच्या परिसरात आकर्षक पोस्टर्स आणि मंडप उभारण्याच्या कामाने जोर पकडला आहे.
यंदा गोव्यात इफ्फीचे उद्घाटन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.