Rajanikanth's jailer Controversial Scene : अभिनेता रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाने आता 400 कोटी इतकी मोठी कमाई केली आहे.
चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसच्या यशासोबतच आता एका वादग्रस्त सीनचीही चर्चा सुरू. या वादाची ठिणगी आता उच्च न्यायालयापर्यंत गेली आहे. चला पाहुया या वादग्रस्त सीनचे नेमके काय प्रकरण आहे.
साऊथ सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. जेलरने 20 दिवसांत सुमारे 322 कोटींची कमाई केली आहे. एकीकडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे रेकॉर्ड रचत असताना दुसरीकडे चित्रपटाच्या एका सीनमुळे मोठा वाद झाला आहे .
एक कॉन्टॅक्ट किलर आहे, ज्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू म्हणजेच आरसीबीची जर्सी घातली आहे. आता हे पाहून लोकांच्या भावना इतक्या दुखावल्या की त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. आता यावर निर्णय आला आहे. हायकोर्टाने काय म्हटलंय ते सांगतो.
खरे तर 'जेलर' चित्रपटात आरसीबीची जर्सी कॉन्ट्रॅक्ट किलरने घातली आहे. त्यानंतर लोकांनी हायकोर्टात तक्रार केली. तेथे झालेल्या सुनावणीदरम्यान निर्मात्यांना 1 सप्टेंबरपर्यंत चित्रपटातून ते दृश्य हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.
यामध्ये दोन्ही पक्षांची बैठक होऊन तोडगा निघाला. 1 सप्टेंबरपर्यंत हा सीन कोणत्याही थिएटरमध्ये दाखवला जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशही न्यायालयाने निर्मात्यांना दिले आहेत.
उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की जेव्हा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाईल तेव्हा तो संपूर्ण बदलांसह दाखवला जावा. त्यात आरसीबीचा सीन नसावा.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडला चित्रपटातील त्या दृश्याविषयी समजले की कॉन्ट्रॅक्ट किलर त्यांची जर्सी घातलेल्या महिलेशी असभ्य भाषा बोलत आहे, तेव्हा त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि ब्रँडच्या विरोधात तक्रार दाखल केली. प्रतिमा खराब केल्याचा आरोप
'जेलर' हा तमिळ भाषेतील अॅक्शन-कॉमेडी चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले असून कलानिती मारन यांनी निर्मिती केली आहे. यामध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहे.
चित्रपटात विनायकन, रम्या कृष्णन, वसंत रवी, सुनील, योगी बाबू यांच्यासह इतर कलाकार आहेत. या चित्रपटाची कथा एका निवृत्त जेलरभोवती फिरते ज्याला मूर्ती तस्कराला पकडायचे आहे.