Flashback 2022 : सरत्या वर्षात अनेक दिग्गजांचा मृत्यू, २०२२ मधील दिवंगत व्यक्तींचा आढावा

२०२२ मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला विचार केल्याशिवाय सोडता येणार नाही.
Flashback 2022
Flashback 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

नववर्ष सरत्या वर्षातील अनेक आठवणींना मागे टाकतं. त्याप्रमाणे २०२३ च्या आगमनाच्या चाहुलीसह २०२२ हे वर्षही असंच मागे पडत चाललं आहे. मात्र, २०२२ मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा नववर्षाच्या पूर्वसंध्येला विचार केल्याशिवाय सोडता येणार नाही. यातील एक बाब म्हणजे या वर्षातील दिग्गजांचे झालेले मृत्यू. हे दिग्गज लोक कोण होते याचा हा आढावा…

लता मंगेशकर-
गानकोकिळा लता मंगेशकर दीर्घकाळ आजारी होत्या. ६ फेब्रुवारी २०२२ रोजी लता मंगेशकर यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरला आहे. त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला.

बप्पी लहरी-
संगीतकार गायक बप्पी लहरी यांचं १५ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झालं. बप्पी दा यांना मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी १४ फेब्रुवारीला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने बप्पी दांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना घरी बोलावलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बप्पी दा यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. OSA (obstructive sleep apnea) मुळे त्यांचा निधन झालं.

रमेश देव-
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं वयाच्या ९३ वर्षी हृदयविकाराने निधन झाले. निधनाच्या चार दिवसांपूर्वी त्यांचा ९३ व्या वाढदिवस साजरा केला होता. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार-
दिग्गज अभिनेते दिलीप कुमार दीर्घकाळापासून आजारी होते. त्यांनी ७ जुलै २०२१ रोजी अखेरचा श्वास घेतला.

Flashback 2022
Salman khan life story: सलमान खानबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

किशोर नांदलस्कर-
प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांनी २० एप्रिल २०२१ रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक मराठी सिनेमे, नाटक, हिंदी सिनेमांतून आपल्या अनोख्या अभिनयाने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.

Flashback 2022
Salman Khan Fitness: दबंग खानच्या फिटनेसचे रहस्य आहे तरी काय?

राणी एलिझाबेथ (दुसरी)-

यांचं निधन २०२२ मधील जगभरातील दिग्गजांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलं. एलिझाबेथ यांनी मागील ७० वर्षे ब्रिटनच्या राजघराण्याच्या प्रमुखपदावर विराजमान होऊन काम केलं. राणी एलिझाबेथ ब्रिटनमधील अनेक सामाजिक बदलांच्या साक्षीदार राहिल्या. इतकंच नाही, तर अनेक कौटुंबिक भूकंपांचाही त्यांनी सामना केला. ब्रिटनमध्ये बहुतांश नागरिकांनी पाहिलेली राणी म्हणूनही एलिझाबेथ यांचं ओळख आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये झालेलं राणी एलिझाबेथ यांचं निधन या वर्षातील सर्वात ‘हाय प्रोफाईल’ व्यक्तीचं निधन मानलं गेलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com