Salman khan life story
Salman khan life storyDainik Gomantak

Salman khan life story: सलमान खानबद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

सलमान अनेक वर्ष बिग बॉस होस्ट करतोय. यात त्यानं अनेकवेळा खुलासे केलेत.
Published on

बॉलिवूडचा सुपरस्टार आणि 'दबंग' अभिनेता सलमान खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबातील सदस्य त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉसमध्ये बंद घरात असलेल्या सेलिब्रेटींची पोलखोल करत असतो. सलमान अनेक वर्ष बिग बॉस होस्ट करतोय. यात त्यानं अनेकवेळा अनेकांचे खुलासे केलेत.

इतरांची पोलखोल करणाऱ्या सलमानच्या रंजक गोष्टी फार कमी लोकांना माहिती असतील. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सलमानचा आजवरचा प्रवास तसा खडतर होता. आई वडील अभियन क्षेत्रातील असूनही सलमाननं स्ट्रगल केला. सलमाननं वडिलांचा महिन्याचा संपूर्ण पगार जाळला होता. इतकंच नाही तर एका वेळेस भाईजान 30-35 चपात्यांवर ताव मारायचा.

सलमान पुढे म्हणाला, 'वजन वाढवण्यासाठी 30-30 चपात्या, राजमा आणि त्यानंतर भात खायचो. माहिती नाही खाल्लेल सगळं कुठे जायचं. आजकाल एक चपाती खायलाही जास्त होते. आता आल्मंड मिल्क हवं असतं तेव्हा आम्हाला हे काहीच माहिती नव्हतं. आमच्याकडे नॉर्मल दूधही मिळत नव्हतं'.

Salman khan life story
Kamal Haasan: कमल हसन यांचे हिंदी भाषेवरचे हे विधान वादग्रस्त ठरू शकते.

आधी सलमान खाननं वडिलांचे पैसे जाळले अशा चर्चा होत्या. मात्र या अफवांवर एकदा सलमान खानचं मौन सोडलं होतं. सलमाननं म्हटलं, मी 6-7 वर्षांचा होतो तेव्हा 'एके दिवशी दुपारी असं झालं की मी बास्केटमध्ये काही जाळत होतो. त्या आगीत आणखी काही टाकण्यासाठी मी काही शोधत होतो. मी पाहिलं की माझे वडील काही पेपर एका ठिकाणी टाकत होते. मी त्यातील काही पेपर घेतले आणि जाळून टाकले. नंतर मला कळलं की मी त्या पेपरबरोबर जवळपास सातशे रुपये देखील जाळून खाक केले होते'.

Salman khan life story
Happy Birthday Salman Khan: बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या भाईजानबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

तेव्हा सलमानच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. इंदौरहून त्याचे वडील 60 रुपये घेऊन मुंबईत आले होते. सलमान पुढे म्हणाला, 'या घटनेनंतर आई मला खूप ओरडली होती. पण वडीलांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. ते आईला म्हणाले, तो अजून लहान आहे, त्याला कुठे माहिती आहे की ते पैसे आहेत. त्या महिन्यात आईला घर चालवणं खूप कठीण गेलं होतं. मग ही गोष्ट आमच्या शेजाऱ्यांना कळली. त्यांची आणि आमची परिस्थिती सारखीच होती. त्यांनी आम्हाला मदत केली. त्याच्या मदतीनं आम्ही कसा बसा महिना काढला'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com