अभिनेत्री 'मलेसा'ची हत्या, मृत्यूसमयी गरोदर असल्याची माहिती

हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलेसा हिची निघृण हत्या झाल्याची घटना घडली आहे.
 Brutal murder of famous Hollywood actress Malesa
Brutal murder of famous Hollywood actress MalesaDainik Gomantak

Brutal murder of famous Hollywood actress Malesa : हॉलीवूडमधून एक हृदय पिळवटून टाकणारे वृत्त समोर आले आहे. एका अमेरिकन अभिनेत्रीची निघृणपणे हत्या करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री गरोदर होती. या अभिनेत्रीच्या मृत्यूने हॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे. चला पाहुया यासंदर्भातले सविस्तर वृत्त

अभिनेत्री मलेसाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार गर्भवती लॉस एंजेलिस मॉडेल मलेसा मेरी मूनीच्या रहस्यमयी आणि निघृण हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मलेसा तिच्या राहत्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये बांधलेल्या अवस्थेत आढळुन आली. आणि दुर्देव म्हणजे, ती दोन महिन्यांची गर्भवती होती.

मलेसाचा मृतदेह फ्रिजमध्ये

मिळालेल्या माहितीनुसार 31 वर्षीय मॉडेलचा मृतदेह तिच्या डाउनटाउन लॉस एंजेलिस अपार्टमेंटमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये आढळून आला. सप्टेंबर महिन्यात तिच्या आईने तपासणीची विनंती केल्यानंतर अधिकारी मलेसाच्या अपार्टमेंटला भेट देण्यासाठी गेले. तेव्हा ही गोष्ट उघडकीस आली.

हत्येप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तिच्या निधनानंतर, मलेसाची बहीण जॉर्डिन पॉलीन हिने मलेसा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड केले.

 Brutal murder of famous Hollywood actress Malesa
"आम्हाला खोटं सांगायची गरज नाही" लिओचा निर्माते ललित कुमार ट्रोलर्सवर भडकले

रक्ताने माखलेले शरीर

पोलिसांनी तपास केल्यावर उघड झाले की, मलेसाचे संपूर्ण शरीर रक्ताने माखले होते, तोंड बंद होते, हात-पाय बांधलेले होते. यावरून मॉडेलची निर्घृण हत्या झाल्याचे स्पष्ट होते.

मात्र, आरोपी कोण याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस त्यांच्या सोशल मीडियावरून सतत पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय मलेसाचे कोणाशी संबंध होते, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com