रायगड: आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Self Government Institutions) निवडणुकीत युवकांना उभे राहण्याची संधी राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षांकडून दिली जाणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी रोहा येथे झालेल्या जिल्ह्याच्या युवक मेळाव्यात ग्वाही दिली आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरवर ठेवण्याचे आवाहन युवकांना खासदार (MP) सुनील तटकरे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युवकांच्या साथीने आगामी निवडणुकीचे रणशिंग या मेळाव्याच्या निमित्ताने फुंकले आहे.
रोहा येथे कुंडलिका नदी (Kundalika River) संवर्धन प्रकल्प येथील पटांगणात रायगड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात युवक हे पक्षाची ताकद असून त्यांना राजकारणात संधी देणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे धोरण आहे. त्यामुळे विधानसभेतही पक्षाने युवकांना संधी दिली असल्याने तरुण चेहरे हे सभागृहात दिसत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे खासदार तटकरे यांनी भाषणातून तरुणाईला ग्वाही दिली आहे.
राज्यात आघाडी सरकार असून नेते जो निर्णय घेतील त्याचे पालन पक्ष करणार आहे. रायगडात निवडणुकीत तरुणाईच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक नंबरवर ठेवण्याचे आवाहनही तटकरे यांनी युवक कार्यकर्ता मेळाव्यात युवकांना केले आहे. पालकमंत्री अदिती तटकरे, पारनेरचे आमदार (MLA) निलेश लंके(Nilesh Lanka), मावळचे आमदार सुनील शेळके,(Sunil Shelke,) आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, कार्याध्यक्ष मधुकर ठाकूर यासह युवक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या युवक मेळाव्याने पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.