मी पोलीस होणार...

78 शिपाई पदासाठी रायगड (Raigad) जिल्ह्यातील 21 केंद्रावर लेखी परीक्षा पार पडल्या. यामध्ये 9 हजार 600 विधार्थी (Student) आले आहेत अर्ज. 4 हजार 595 उमेदवारानी दिली परीक्षा.
 पोलीस भरती
पोलीस भरती Dainik Gomantak

रायगड: पोलीस दलात शिपाई होऊन जनतेची सेवा करण्याची मनात इच्छा ठेवून हजारो उमेदवार आज परीक्षा देत आहेत. रायगड (Raigad) जिल्हा पोलिस दलातील 78 जागेसाठी जिल्ह्यातील 21 केंद्रावर ही 4 हजार 595 उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाकडून तयारी याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. परीक्षेच्या (Exam) अनुषंगाने केंद्रावर चोख बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

2019 मध्ये पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे अर्ज मागविण्यात आलेले होते. मात्र त्यानंतर कोरोनाचा (Covid 19 ) प्रादुर्भाव सुरू झाला आणि भरती प्रक्रिया पुढे गेली. 18 ऑक्टोबर रोजी आज या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली.

 पोलीस भरती
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात वाढतायत; जबाबदार कोण?

यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी राज्यातून हजारो तरुण परीक्षेसाठी आले होते. 78 जागांसाठी जवळपास 9 हजार 600 तरुणांनी अर्ज केला होता. या लेखी परीक्षा जिल्ह्यातील 21 केंद्रावर घेण्यात आल्या. परिक्षेपूर्वी पोलिसांकडून प्रत्येक उमेदवारांची तपासणी करून परीक्षा केंद्रात सोडले. लेखी परीक्षेत पारदर्शकता राखून ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. लेखी परीक्षेच्या अनुषंगाने केंद्रावर (Exam Center) पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मैदानी परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com