Yakub Memon Grave: भाजपचे उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र, दहशतवाद्याची कबर...

मुंबईतील दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
Yakub Memon Grave
Yakub Memon GraveDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबईतील दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे समाधीत रूपांतर केल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरेंच्या मौनावरही भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच राहुल गांधी आणि शरद पवार यांनीही यावर जाब विचारला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीचे संगमरवरी आणि एलईडी लाईटने सजवून समाधीत रूपांतर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, वाद वाढल्यानंतर मुंबई पोलिसांनी कबरीवरील दिवे हटवले.

हा मुद्दा उपस्थित करत भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबतच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये भागीदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून जाब विचारला आहे. याकूब मेमनला टाडाच्या विशेष न्यायालयाने 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात दोषी ठरवले होते.

Yakub Memon Grave
महाराष्ट्रातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, 13 ऑक्टोबरला मतदान

कोण होता याकुब मेमन

याकुब मेमन हा मुंबई बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनचा भाऊ होता. याकूब मेमनला टाडा न्यायालयाने 2007 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर 30 जुलै 2015 रोजी दहशतवादी याकूबला फाशी देण्यात आली, त्यानंतर याकुबचा मृतदेह मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ही समाधी सुशोभित करण्यात आली होती, आजूबाजूला फरशा लावण्यात आल्या होत्या, समाधी एलईडी लाईटने सजवण्यात आली होती, असा आरोप भाजपने केला आहे.

Yakub Memon Grave
Amit Shah Mumbai Tour: गृहमंत्री शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सूरक्षा यत्रंणेचे दूर्लक्ष

भाजपने काय आरोप केले?

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात हजारो लोकांचा बळी घेणारा पाकिस्तानच्या इशार्‍यावर काम करणारा याकुब मेमनची कबर अशी कशी सजवली जाऊ शकते. असा सवाल भाजपने केला आहे. राम कदम म्हणाले, 'उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे काम करण्यात आले. राहुल गांधी आणि शरद पवार यांचा पक्ष त्यांच्यासोबत सत्ता वाटून घेत होता. त्यांच्या नेतृत्वाखाली ही समाधी समाधी बनली, चहुबाजूंनी संगमरवरी आणि एलईडी दिवे लावण्यात आले. सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याकुब मेमन हा आतंकवादी होता. त्याची समाधी बांधली जात असताना ठाकरे गप्प का होते, त्यांच्या मौनामागे काय रहस्य आहे?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com