Will Go To Court If Ajit Pawar Group Doesn't Stop Using Photo Says Sharad Pawar:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीवरून निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर पुन्हा एकदा स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
बुधवारी पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा फोटो वापरल्याबद्दलही प्रतिक्रिया दिली.
पवार म्हणाले, 'अजित पवार माझा फोटो वापरत आहेत. यापासून त्यांना थांबवले जाईल. त्याचबरोबर गरज पडल्यास याप्रकरणी न्यायालयात जाऊन त्यांना आव्हान देऊ.
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या बंडखोर गटाने त्यांच्या बॅनर आणि होर्डिंग्जवर त्यांचे चित्र वापरणे थांबवले नाही तर ते न्यायालयात जातील, अशी घोषणा केली. त्याचवेळी अजित पवार गटाच्या पक्ष ताब्यात घेण्याबाबत प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली.
पवार म्हणाले, 'निवडणूक आयोगाने (Election Commission) उद्धव ठाकरेंशी जे केलं तेच आमच्यासोबतही होऊ शकतं. आयोग स्वत:हून निर्णय घेत नसून दबावाखाली घेत आहे. आयोगानेच निर्णय घेतला तर मला त्याची काळजी नाही.
पवारांनी गेल्या शनिवारी पुण्यात अजित यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
या बैठकीमुळे त्यांचे महाराष्ट्र विकास आघाडी मित्र-काँग्रेस आणि शिवसेना इतके नाराज झाले की त्यांनी पहिल्यांदाच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
बुधवारी पवारांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेत, या भेटीनंतर निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे अन्य दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यापासून फारकत घेणार असल्याचे वृत्तही फेटाळून लावले.
यावेळी काही पत्रकारांनी काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रवादीशिवाय एकत्र निवडणूक लढवण्याचा प्लॅन-बी तयार केल्याच्या बातम्या समोर येत असल्याचे सांगितले. पण पवार म्हणाले, त्यांचे असे कोणतेही नियोजन नाही. ही केवळ अफवा पसरवली जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.