Raj Thackeray On Goa-Mumbai expressway:
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये पक्षाचा निर्धार मेळावा घेतला. यामध्ये ठाकरे यांनी गोवा-मुंबई महामार्गावर भाष्य केले.
यावेळी राज ठाकरे यांनी गोवा-मुंबई महामार्गाच्या रखडलेल्या कामावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले समृद्धी महामार्ग जर चार वर्षांत पूर्ण होत असेल तर गोवा-मुंबई महामार्ग गेल्या 16 वर्षांपासून तसाच का आहे?
गोवा-मुंबई महामार्गावर आतापर्यंत दहा वर्षांत 2500 लोक मृत्यूमुखी पडल्याचेही राज ठाकरे यांनी नमूद केले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 2024 च्या गणपती पूर्वी गोवा-मुंबई महामार्ग पूर्ण होईल असले सांगितले आहे. यावर राज ठाकरे म्हणाले, रस्ता पुढच्या गणपतीला होईल मग आताचे काय?
या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी प्रमाख्याने गोवा-मुंबई महामार्गावर भाष्य केले. त्याचबरोबर गोव्यातील जमीन कायद्याचे कौतुक केले.
ते म्हणाले गोव्यात भाजप सरकार आहे. तेथे त्यांनी परप्रांतियांना जमिनी न विकण्याचा कायदा केला आहे. तो कौतुकास्पद आहे. नाहीतर आपल्याइकडे आपलेच लोक जमिनी परप्रांतियांच्या घशात घालायला बसले आहेत.
यावेळी राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा टोल नाक्याच्या मुद्द्यावरून खरपूस समाचार घेतला. मनसेने कधीतरी रस्ते आणि टोननाकेही बांधायचा प्रयत्न करावा अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती.
यावर राज ठाकरे म्हणाले, भाजपनेही कधीतरी दुसऱ्या पक्षाचे आमदार न फोडता स्वबळावर निवडूण आणावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.