Mumbai-Chipi Flights: कोकणातलो चाकरमानी येतलो आता थेट विमानानं...; 10 दिवसांत सुरु होणार मुंबई-चिपी विमानसेवा

Mumbai to Sindhudurg Flights: कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या १८ एप्रिलपासून 'एअरलायन्सची विमानं मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई या मार्गावर सुरु होणार आहेत.
Mumbai to Sindhudurg Flights
Mumbai to Sindhudurg FlightsDainik Gomantak
Published on
Updated on

मालवण: कोकणातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या १८ एप्रिलपासून 'एअरलायन्सची विमानं मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई या मार्गावर सुरु होणार आहेत. ही सेवा स्थानिक प्रवाशांसाठी तसंच मुंबईहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

एअरलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्यासाठी देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. सिंधुदुर्गातील पर्यटन, उद्योग, व्यापाऱ्यांना चालना देण्यासाठी आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विमानसेवांचा मोठा वाटा राहणार आहे, असं मतही नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

परुळे-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या १८ एप्रिलपासून 'एअरलायन्स'ची मुंबई-चिपी-मुंबई ही विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. ही सेवा स्थानिक प्रवाशांसह मुंबईहून कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Mumbai to Sindhudurg Flights
Goa Education: शाळा 'गजबजणार' सोमवारपासून! पालकांची याचिका फेटाळली; 6 वी ते 10 वी, 12 वीचे वर्ग होणार सुरू

नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळासाठी विशेष योजना तयार करून त्या अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर गेल्या आठवड्यापासून सिंधुदुर्ग-पुणे विमान सेवा सुरू करण्यात आली आहे, ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण बाब असल्याची माहिती राणेंनी दिली.

एअर अलायन्सची विमानं मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई या मार्गावर सुरु करण्याच्या निर्णयामुळं कोकणात जाणं सोईस्कर होणार आहे. मुंबई व पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांशी थेट विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे कोकणातील स्थानिक नागरिक, व्यावसायिक, तसेच देश-विदेशातील पर्यटक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com