महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच का ? शरद पवारांनी दिलं उत्तर

एकनाथ शिंदेच्या सत्ता स्थापनेनंतर शरद पवारांनी सोडले मौन
Sharad Pawar
Sharad PawarDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यांमध्ये घडलेले सत्तानाट्य संपुर्ण देशाने पाहीले. गुजरात, आसाम आणि गोवा राज्यातील ठिय्यानंतर बंडखोर आमदारांचा गट महाराष्ट्र विधानभवनात उतरला. यानंतर या आमदारांनी आपण शिवसेनेत सुरु असलेल्या मनमानी टाळण्यासाठी भाजपशी हात मिळवणी केली, तसेच काही आमदारांनी शिवसेना नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त केली होती. असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज यावर आज भाष्य केले. ( Why Uddhav Thackeray as the Chief Minister of Mahavikas Aghadi government? Sharad Pawar gave the answer )

Sharad Pawar
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाच्या बंडखोरीपासून ते सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्वाचे मुद्दे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचं नेतृत्व करण्याची आणि मुख्यमंत्री पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर का देण्यात आली याबद्दलचा खुलासा केलाय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यामागील कारण सांगितलं.

Sharad Pawar
अनिल देशमुखांचा जामीन CBI न्यायालयाने नाकारला

तीन पक्षांना मान्य होईल अशी व्यक्ती असणे आवश्यक होते

पवार म्हणाले की, “काही लोक राजकीय निर्णयांबद्दल असं म्हणतात की त्यांच्या पक्षाचा निर्णय वेगळा असतो. पक्षाचा निर्णय वेगळा असू शकेल. पण ते सरकार एका पक्षाचं नव्हतं,” असं . पुढे बोलताना, “महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांचं होतं. त्यामुळे तीन पक्षांना मान्य होईल अशी व्यक्ती असावी यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचं नाव आलं.

कोणी काही सुचवलेलं नव्हतं. शेवटी हे सरकार चालावं अशी अपेक्षा होती,” असं पवार उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपद कसं आलं यासंदर्भात भाष्य करताना म्हणाले. तसेच मुख्यमंत्रीपदाची जाबबदारी स्वीकारण्याचा आग्रह केला होता, असं ही सांगितलेलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com