अनिल देशमुखांचा जामीन CBI न्यायालयाने नाकारला

Corruption Case: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दणका
Maharashtra former Home Minister Anil Deshmukh
Maharashtra former Home Minister Anil Deshmukh Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे. तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. (Maharashtra former Home Minister Anil Deshmukh News)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर ईडीने देशमुखांना त्याबाबत अटक केली होती. त्यानंतर सीबीआयनेही कारागृहात जाऊन देशमुखांची गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती.

Maharashtra former Home Minister Anil Deshmukh
शिंदे सरकारची मोठी परीक्षा! 16 आमदारांच्या निलंबनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांच्यावर आरोपपत्र दाखल केले असून बडतर्फ पोलीस अधिक्षक सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. त्याप्रकरणात देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने अद्याप देशमुख यांना दिलासा दिला नाही.

दाखल केलेले आरोपपत्र केवळ 59 पानांचे असून आरोपपत्र अपूर्ण आहेत. तसेच ताब्यात घेतल्याच्या 60 दिवसांच्या आत चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे. तसेच तपास पूर्ण झाल्याशिवाय अपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात आल्यामुळे देशमुख जामीनासाठी पात्र असल्याचा दावाही देशमुखांनी याचिकेतून केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com