कोण कोणाचे सांत्वन करणार? आईचा आशीर्वाद हरपला...

लता मंगेशकरांचे पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी प्रभूकुंज निवासस्थानी पोहोचलं. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे स्नेहबंध हे जुनेच आहेत. त्यामुळे कोण कोणाचे सांत्वन करणार?
Mothers Blessings Lost Chief Minister Mourn Latadidis Death
Mothers Blessings Lost Chief Minister Mourn Latadidis DeathDainik gomantak

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना ची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याची कोरोणा टेस्ट ही निगेटिव्ह सुध्दा आली होती. तरीही रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांनाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावरच नव्हे तर देशावरच शोककळा पसरली.(Mothers Blessings Lost Chief Minister Mourn Latadidis Death)

Mothers Blessings Lost Chief Minister Mourn Latadidis Death
Hindustani Bhau: विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर 28 जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र 5 फेब्रुवारीला पुन्हा प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचे पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी प्रभूकुंज निवासस्थानी पोहोचलं आहे.

लता दीदींच्या जाण्याने एका स्वर युगाचा अंत झाला आहे. एक महान पर्व संपले असून आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून शरीराने गेल्या, पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे स्नेहबंध हे जुनेच

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे स्नेहबंध हे जुनेच आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. लतादीदी छायाचित्रकार होत्या ईतकेच नव्हे तर कॅमेरे लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यासही होता. त्यांच्याशी मध्यंतरी फोटोग्राफी वर चर्चा सुध्दा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून मला दाद दिली होती. तसेही काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे.

मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून मला आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा ते स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील. लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबीयांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. त्यामुळे कोण कोणाचे सांत्वन करणार?

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हटले आहे की, आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीत, हे मन सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतीलही. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग, क्षण लतादीदींनी आपल्या सुमधुर सुरानी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी विविध मंगल क्षण सजले तर दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव सुध्दा घेतला. लढाईच्या संघर्षात याच स्वरांनी उर्मी जागवली. जगाचा क्वचितच असा एखादा कोपरा असेल की जिथे त्यांचा स्वर पोहोचला नसेल, ऐकला गेला नसेल. अश्या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com