बीड जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा सोसताना सर्वसामान्यांला दाही दिशा पाण्यासाठी धावा धाव करावी लागत आहे. वाड्या वस्ती तांडा सुधार योजनेअंतर्गत मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी, लाखो रुपये खर्च करून राबवलेल्या पाणीपुरवठा योजना कागदावरच असल्याने नागरिकांची पाण्यासाठीची वणवण संपायला तयार नाही. यामुळे पाण्यासाठी वयोवृद्धांसह गावकऱ्यांना एक ते दीड किलोमिटर पायपीट करावी लागती आहे.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील 4 हजार लोकवस्तीच्या वारोळा गावात, तीन तांडे आहेत. मात्र आजही वयोवृद्ध लोकांच्या डोक्यावरील हंडा अद्याप खाली उतरलेला नाही. पाण्यासाठी जिवाचा आटापिटा करून हातपंपावर पाणी भरणाऱ्या अबावृद्धांना पाहिल्यानंतर राजकिय नेत्यांनी कागदावरच असलेल्या योजना कशा हडप केल्या याचा प्रत्यय आल्याखेरीज राहात नाही.
गावात पाणी पुरवठ्यासाठी 3 विहिरी आहेत. या विहिरीला पाणी देखील लागले, मात्र आज प्रत्यक्ष या विहिरीचे पाणी सरपंच आणि त्यांच्या नातेवाईकांच्या शेताला जात आहे. गावाला पाणीपुरवठा केला जावा, यासाठी तब्बल 90 लाख रुपये आणि आत्ता सुरू असलेली 68 लाख रुपयाची योजना एवढा पैसा खर्च करूनही. एकीकडे गाव मात्र पाण्यापासून उपाशी असताना, त्यामुळे लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
वारोळा गावातील जोड तांड्यावरील 65 वर्षीय धुनाबाई पवार यांना, या वयात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे, लांबून पाणी डोक्यावर शेंदून आणावं लागतंय. मात्र पाणी आणण्याशिवाय पर्याय नाही, आमच्यासारखे गरीब माणसाकडे नळ योजना आली नाही. मतदानाच्या वेळेला येतात, मात्र आता आमच्याकडे कोणी येत नाही.
पाणी घेऊन येताना हंडा घेऊन पडले तर एका माणसाने मला उचलून उभा केलं. आता पाणी ही खूप मोठी समस्या बनली आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी एका वृद्धाने बोलताना भाकर नसली तरी चालेल पाणी मिळावं अशी वयोवृद्धांची आर्त हाक घातली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.