राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा: या जिल्ह्याना अलर्ट!

उद्या पासून पुढील चार ते पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अ‌ॅलर्ट (Orange and Yellow Alert)जारी करण्यात आले आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी याबाबत आपले ट्विट केले आहे.
Rain
Rain Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (Meteorological Department)पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. पुढील 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यताही आहे. अशी शक्यता IMD ने वर्तवली आहे. तसेच ते आतल्याच दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आणि त्याचा परिणाम होणार आहे. त्याच्याच परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस जोरदार वेगवान वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, यांचेकडून हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

कशी असेल राज्यातील आजची स्थिती ?

हवामान खात्याने आजसाठी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिले आहेत. तसेच, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अ‌ॅलर्ट दिला आहे.

अशी असेल 13 सप्टेंबरला पावसाची स्थिती?

हवामान खात्याने सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

तसेच, 14 सप्टेंबरला पावसाची स्थिती?

हवामान खात्याने मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अ‌ॅलर्ट जरी केला आहे.

आणि 15 सप्टेंबरला पावसाची स्थिती?

हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट दिला आहे.

तसेच गुरुवारी 16 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा (Rain warning)देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com