ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेच्या हितासाठी अनेक प्रकारची उपोषण यापुर्वी केली आहेत. या उपोषणाद्वारे सरकारला जाब ही विचारले आहेत. मात्र गेले कित्येक दिवस जनता महागाईने होरपळत असताना अण्णा हजारे कोणतीच भुमिका घेताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.( Wake up Anna Hazare; An agitation to wake up the sleeping Anna Hazare )
मागील दोन लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात झोपी गेलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी 'अण्णा उठो' आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.
घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत, असा सवालही त्यांनी केला. अण्णा हजारे हे झोपले असतील तर त्यांना झोपेतून उठवण्याची आवश्यकता आहे. अण्णा हजारेंनी जनतेसाठी महागाईविरोधात जनआंदोलन सुरू करण्याची गरज असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.
महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा
गेल्या काही दिवसांपुर्वीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला आंदोलनाचा इशारा दिला आहे. एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा असा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. पण जनतेच्या इतर मुद्यांवरुन ते बोलत नसल्याचा आरोप करत अण्णांच्या विरोधा ही घोषणा करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.