विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच कायम

निवडणूक अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात घेण्याची तयारी पक्षाने केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केल तर मंत्री नवाब मालिक यांनी दुसऱ्या आठवड्यात होईल असे आज स्पष्ट केले.
Maharashtra Vidhan Bhavan
Maharashtra Vidhan BhavanDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र विधानसभेचे गेल्या कित्येक महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनामध्येच ही निवडणूक पार पाडली जावी, यासाठी सरकारने प्रयत्न केला होता. मात्र, नियमांमध्ये करण्यात आलेले बदल असंवैधानिक असल्याने राज्यपालांनी (Governor) त्यास मंजूरी दिली नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हट्ट धरूनही गेल्या तीन अधिवेशनांत या पदाची निवडणूक टळल्यानंतर काँग्रेस नेतृत्व सावध झालं आहे.

Maharashtra Vidhan Bhavan
Narayan Rane Press Conference: 'संजय राऊत शिवसेनेचा पगारी नेता'

येत्या अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक घेण्याची तयारी पक्षाने केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केलंय. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नव्या अध्यक्षांचे नाव जाहीर करणार असल्याचंही नाना पटोले यांनी संगितले.

महाविकास आघाडी स्थापण झाली त्यावाळेस विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे (Congress) आले. सुरीवातीला नाना पटोले (Nana Patole) यांच्या कडे हा पद होता. परंतू ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ते पद रिक्त आहे. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या हालचालींना काँग्रेसकडून वेग आला. या काळात अधिवेशनांत निवडणूक होणार असल्याचे पटोले यांनी तीनदा स्पष्ट केले होते.

मात्र कोरोना, हिवाळी अधिवेशनात निवडणुकीच्या प्रक्रियेतील बदलामुळे ही निवडणूक झाली नाही. हे कारण जरी असले तरी , महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटक पक्षांतील मतभेद, ठाकरे सरकार विरोधकांमधील संघर्षातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टळल्याचे दिसून आले. त्यात काँग्रेसमधील नेत्यांचा वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 3 मार्चपासून होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या आठवड्यातच निवडणूक घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष निवडणूक ही 9 मार्च रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद याबाबतची माहिती राज्याचे मंत्री नवाब मालिक यांनी दिली आहे. ते म्हणाले की विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात होईल असे आज स्पष्ट केले. ते म्हणाले की निवडणूकीचा कार्यक्रम हा राज्यपालांना दिला नाही. तो ठरविल्यावर राज्यपालांना देण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com