औरंगाबादेत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा दिसतो कसा,पहा व्हिडिओ

औरंगाबादमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे ढोल ताश्यांच्या गजर आणि आतीषबाजीसह अनावरण करण्यात आले.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022Twitter
Published on
Updated on

आज देशात शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जात आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) आतीषबाजी, ढोल ताशांच्या गजरात 52 फुट उंचीचा पुतळा उभारण्यात आला. तेव्हा जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने आसमंत दुमदुमला. यावेळी लोकांची मोठ्या संख्येने गर्दी केली होती. देशातील सर्वाधिक उंच असलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022)

शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) आदल्या दिवशी ढोल ताशाच्या गजर, रोषणाई,आतिषबाजीसह छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा औरंगाबादला (Aurangabad) उभारण्यात आला. या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी केवळ औरंगाबादकरच नाही तर आजूबाजूच्या भागातूनही अनेक लोक पोहोचले होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन, केजरीवालांचं मराठीत ट्वीट

औरंगाबादच्या क्रांती चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन रात्री 11 च्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि अजित पवार यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आले. तर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई प्रत्यक्ष उ्घटनाला उपस्थित होते.देशातील सर्वाधिक उंच असलेले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) भव्य पुतळ्याची ऊंची 21 फुट असून वजन 7 टन आहे. याचा चौथरा 31 फुट असल्यामुळे एकूण पुतळा 52 फुट उंच आहे. या पुतळ्याच्या भोवती 24 कमानीमध्ये 24 मावळ्यांच्या सुंदर प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com