महाराष्ट्र: आधीच्या फडणवीस सरकारमध्ये (Fadnavis Government) आरोप झालेल्या सर्व मंत्र्यांना क्लीन चिट देण्याचं काम फडणवीस यांनी केलं. मात्र एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना ही क्लीन चिट ते देऊ शकले नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
ते चंद्रपुरात पत्रकारांशी बोलत होते. समग्र राजकीय कारकीर्द भाजपच्या (BJP) उत्कर्षासाठी घालवणाऱ्या खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांवर आज केंद्रीय यंत्रणांकडून जी कारवाई केली जात आहे, ती योग्य नाही. ED, CBI, आयकर विभागाचा (Income Tax Department) वापर करून सत्तेत येण्याचे स्वप्न हे बघत आहेत. पण यामुळं जनमानसात यांचीच प्रतिमा मालिन होत आहे, असं भुजबळ म्हणाले.
विरोधात बोलणाऱ्यांना लक्ष्य करून त्यांना संपवण्याचा विचित्र खेळ भाजप खेळत आहे. महाराष्ट्र सदनात कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप माझ्यावर ही झाला होता. यानंतर शेवटी काय झालं? न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पण यामुळं मला, माझ्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा, जेलयात्रा झाली. हे महाराष्ट्राच्या परंपरेला (tradition) शोभणारे नाही. असं भुजबळ म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.