Uddhav Thackeray: जे.पी नड्डा यांची प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा - उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: जे.पी नड्डा यांची प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा - उद्धव ठाकरे

मार्मिक वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांची चौफेर फटकेबाजी
Published on

भाजपचे राष्ट्रिय अध्यक्ष जे.पी नड्डा (J.P Nadda) यांनी देशात एकच पक्ष राहणार आहे, शिवसेना तर संपलाच आहेच. असे वक्तव्य केले. नड्डा यांची प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा आहे. असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. आपला देश हा संघराज्य आहे, ते संघराज्य नड्डांना संपविण्याचा आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. मार्मिकच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray: जे.पी नड्डा यांची प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा - उद्धव ठाकरे
Goa Congress: अधिकाऱ्यांना बळीचा बकरा करणारे मंत्रीही अन्ननासाडीला जबाबदार

उद्धव ठाकरे म्हणाले, 'सरकारची लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक आहे. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरणासाठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत. पण सैन्यासाठी नाही.' असा हल्लाबोल त्यांनी केला. 'राज्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला आहे पण, खाते वाटप कुठे आहे. राज्यात पूरपरिस्थिती आहे अशा काळात मंत्र्यांकडे खाती नसल्याने जाणार कोण असा प्रश्न आहे. सगळी मजा चालू आहे.' असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर लगावला.

'शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत, मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. काहींना असं वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली एक वस्तू आहे. जी कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतं. तसं नाही आहे. शिवसेनेची पायमुळं 62 वर्ष तर सरळ दिसत आहेच, पण त्याच्या आधीपासून सुद्धा माझ्या आजोबानी या विचारांची पेरणी केली आहे.' असे मार्मिक बद्दल विचार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Uddhav Thackeray: जे.पी नड्डा यांची प्रादेशिक पक्ष संपविण्याची भाषा - उद्धव ठाकरे
Goa Update: पणजी येथील जुना मांडवी पूल उद्या 6 तासांसाठी बंद राहणार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com