Uddhav Thackeray: महाराष्ट दौरा लवकरच करणार; पक्षाचे नाव, चिन्ह परत मिळेल!

उद्धव ठाकरेंचा विश्वास; अंधेरी निवडणुकीत आधी उमेदवार दिला नंतर पळ काढल्याचा आरोप
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Uddhav Thackeray: पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले असले तरी निवडणूक आयोगाचा हा आदेश तात्पुरताआहे. नंतर आपल्या पक्षाचे नाव आणि आपले चिन्ह आपल्याला परत मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

Uddhav Thackeray
Sanjay Raut: संजय राऊत यांना दिलासा नाहीच; कोठडीतील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला

बुलढाण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, धनुष्यबाण काढून घेतले तरी मशाल आहे. रामाने धनुष्यबाणाने रावणाला मारले. मशाल ही अंधारात वाट दाखवते. पक्षाचे नाव गोठवले, चिन्ह गोठवले... शिवसेना संपविण्यासाठीच हे केले गेले. मनस्ताप देण्यासाठी, मुद्दाम छळण्यासाठी हे केले गेले.

एवढे सगळे करूनही शेवटी उमेदवार देऊन निवडणुकीत पळ काढला, असा टोलाही त्यांनी लगावला. अंधेरीची पोटनिवडणूक होणार आहे. त्याबद्दलही काही जणांना वाटतं की मी विनंती केली नाही. पण मी का विनंती करू?” असा सवाल त्यांनी केला.

Uddhav Thackeray
Jayalalithaa Death Probe: जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकलांवर आरोप

अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती, त्यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. तथापि, भाजपने सोमवारी ही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता ऋतुजा लटके यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ठाकरे म्हणाले की, मी आधीच जाहीर केले होते की, दसरा मेळाव्यानंतर महाराष्ट्र दौरा करणार आहे. आता लवकरच राज्याचा मी दौरा करणार आहे. मला अडवण्याचा प्रयत्न झाले तरीही मशाल घेऊन पुढे जाऊयात. राजन साळवींनाही अनेक प्रलोभने दिली गेली. पण हा माणूस डगमडला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ते गद्दारांना गाडून त्यांच्या छाताडावर उभे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com