Sanjay Raut: संजय राऊत यांना दिलासा नाहीच; कोठडीतील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला

न्यायालयात संजय राऊत-एकनाथ खडसेंची भेट
Sanjay Raut
Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

Sanjay Raut:मुंबईतील पत्रा चाळ जमिन घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्यांना मंगळवारीही दिलासा मिळाला नाही. उलट न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी आणखी एकदा वाढवला आहे.

Sanjay Raut
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण

न्यायालयाने म्हटले आहे की, कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या खा. संजय राऊत यांच्या जामिन याचिकेवर आता 21 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल.

न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यानंतर मंगळवारी संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले गेले होते. यावेळी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 21 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

दरम्यान, कोर्टात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. खडसे यांच्यावरही ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असून त्याच प्रकरणात ते कोर्टात आले होते. दोन्ही नेत्यांच्यात यावेळी काही काळ बोलणे झाले. लवकरच तुरूंगातून बाहेर येऊ, असे राऊत यांनी खडसे यांना सांगितले.

Sanjay Raut
Jayalalithaa Death Probe: जयललिता यांच्या मृत्युप्रकरणी शशिकलांवर आरोप

राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी म्हणाले की, राऊतांविरोधाती आऱोप अविश्वसनीय आहेत. त्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हा प्रकार 2008 ते 2012 पर्यंतचा आहे आणि आरोप केवळ 3.85 कोटींचा आहे. पण त्यावरील युक्तीवादानंतर न्यायालयाने राऊतांच्या कोठडीत वाढ केली.

दरम्यान, यापुर्वी दोनवेळा या प्रकरणात संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. या प्रकरणात संजय राऊत यांच्या पत्नीचीही चौकशी झालेली आहे. नुकतेच संजय राऊत यांनी त्यांच्या मातोश्रींना पत्र लिहिले होते, आणि आई मी नक्की परत येईन, असा विश्वास व्यक्त केला होता. मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि देशाचा आत्मा असा सहजासहजी कोणाला मारता येणार नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले, असेही त्यांनी पत्रात म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com