'मला माझा मतदार संघच नाही, महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ': मुख्यमंत्री

महाराष्ट्रात कालपासून शाळेची घंटा वाजली असून आज आपला विधानसभेचा वर्ग भरला आहे. राज्याचा अर्थसंकल्प हा रांगोळीच्या ठिपक्यांसारखा असतो.
Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र (Maharashtra) विधानमंडळ सचिवालयामधील वि. स. पागे संसदीय- प्रशिक्षण केंद्रामार्फत आमदारांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आज पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोबर रोजी सकाळी सभागृह, विधाभवन, मुंबईत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प माझ्या मतदार संघाच्या संदर्भात ... या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी अर्थसंकल्पाबाबत आपलं मत व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात कालपासून शाळेची घंटा वाजली असून आज आपला वर्ग भरला आहे. आपण सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे शिक्षक आणि हेडमास्टर यांचं काम विधीमंडळाचे सभापती आणि उप-सभापती महोदयांना करावं लागणार आहे. माझा मतदार संघ माझे राज्य आहे, त्यामुळे मी बोलायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र तरीही माझ्या राज्याचा, विभागाचा विचार करत नसेल तर मी मुख्यमंत्री कसला.”

Chief Minister Uddhav Thackeray
School Reopen|'काळजी घ्या' चिमुकल्यांना मुख्यमंत्री उध्दव काकांचा सल्ला

शिवाय, ‘’दिवाळी आल्यानंतर मला माझं बालपण आठवत. आम्ही लहाणपणी छानपणे मातीने सावरायचं. त्यावर ठिपक्यांची रांगोळी. अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा आपण कागद ठेवतो त्यावेळी त्या ठिपक्या आखल्या जातात, असा हा अर्थसंकल्प आहे. परंतु ते आखलेले ठिपके हे माझ्या महाराष्ट्रातील मतदारसंघ आहेत. तसेच ते मतदारसंघ ज्यावेळी एकत्र जोडले गेले आणि त्याच्यामध्ये विविध रंग आपण भरले. त्यामुळे त्या रांगोळीला काहीसा अर्थ आहे. रांगोळीमधील ठिपके जोडण्याचे काम आपण निवडूण आलेल्या आमदारांनी करायचं असतं. कारण ठिपका जोडला गेला तर माझे राज्य जोडले जाणार आहे,’’ असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com