सामनाची धुरा पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती; भाजपवर पुन्हा टीकेची झोड उठणार

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे बसले आहेत.
Uddhav Thackeray And Sanjay Raut
Uddhav Thackeray And Sanjay RautDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बसले आहेत. यापूर्वी सामनाच्या संपादकपदी पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची नेमणूक करण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद होते त्यामुळे सामनाच्या संपादकपद पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे देण्यात आले होते. याआधी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे 'सामना'चे संपादक होते मात्र, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ते या जबाबदारीतून मुक्त झाले होते. (Uddhav Thackeray has once again become the editor of Samana newspaper)

Uddhav Thackeray And Sanjay Raut
Swine Flu in Maharashtra: काळजी घ्या! महाराष्ट्रात स्वाईन प्लूचा उद्रेक

दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीकडून (ED) अटक झाल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) हालचालींना वेग आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे आता बोलले जात आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली होती. दरम्यान उद्धव ठाकरे आता कोणत्याही संविधानीक पदावर नसल्याने पुन्हा सामनाच्या संपादक पदाची धुरा सांभाळणार आहेत.

संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री काळात ठेवण्यात अडचणी होत्या मात्र सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी ही रश्मी ठाकरेंकडे सोपवण्यात आली होती.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका परखडपणे मांडत होते.'सामना' म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे 'सामना' असंच समीकरण गेली अनेक वर्षे पाहायला मिळाले आहे. देशातील महत्वाच्या मुद्द्यावर सामनाच्या अग्रलेखातून कोणती 'रोखठोक' भूमिका मांडली आहे, याकडे देशभरातील माध्यमांचं कायमचं लक्ष लागलेले असतं.

Uddhav Thackeray And Sanjay Raut
Maharashtra मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत

भाजपसोबत सत्तेत असतानाही भाजपवर सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे टीकेची झोड सतत उठवत होते. देशभरातील माध्यमांचे लक्ष असणाऱ्या या वृत्तपत्राचे संपादकपद आता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे तसेच उद्धव ठाकरे अग्रलेखातून कोणती आणि कशा प्रकारे भूमिका मांडतात हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आता याकडे सगळ्या भारताचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com