Aurangabad: सत्तांतरनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

हेक्टरी 50 हजार रूपये मदतीची मागणी
uddhav Thackray Visit Aurangabad
uddhav Thackray Visit Aurangabad Dainik Gomantak

पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन, नुकसानीची माहिती जाणून घेतली.

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी देखील यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. पाहणी नंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. "अतिवृष्टीच्या संकटात शेततकऱ्यांचं दिवाळं निघाल आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत मिळाली पाहिजे. या शेतकऱ्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे." असे उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav Thackray Visit Aurangabad
आजही गोव्यात नकरासुराचे दहन केल्याशिवाय दिवाळीला सुरूवात होत नाही

माझा हा दौरा प्रतिकात्मक केला आहे. शिधा वाटपात घोटाळा झाला की, नाही हे पुढे समोर येईल. मी जे म्हणतोय ते शेतकऱ्यांची मागणी आहे. दिवाळी सजारी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का?. ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर झालं पाहिजे होतं. पण भावनांचा दुष्काळ आहे. अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी विद्यमान सरकारवर केला.

दगडाला पाझर फुटतो सरकारला पाझर का फुटत नाही?, त्यामुळे सरकराने आता सरकारला घाम फोडला पाहिजे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com