चौकशीतून सत्य समोर येईल - अनिल देशमुख

अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा टाकला.
Anil Deshmukh
Anil DeshmukhDainaik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा टाकला. यामध्ये अनिल देशमुख यांची सविस्तर चौकशी झाल्यानंतर आता संध्याकाळी अनिल देशमुख यांनीआपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सीबीआय, ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. ईडीचे अधिकारी आज चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांना पूर्ण सहकार्य केलं. पुढील काळातही करू”, असं ते म्हणाले. तसेच, “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे माझ्यावर खोटे आरोप केले होते, ते त्यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर केले. ते पोलीस आयुक्त असताना माझ्यावर आरोप केले नाहीत. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आम्ही त्यांना आयुक्तपदावरून हटवलं”, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले आहेत .

त्याबरोबरच अनिल देशमुखांनी परमबीर सिंह यांच्यावर बोलताना अनेक बाबतीत भाष्य केलं आहे “परमबीर सिंह आयुक्त असताना प्रामुख्याने मुकेश अंबांनींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्यात आलं. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यात एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ सुनील माने असे पाच पोलीस हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कामाला होते. ते सगळे परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होते. शासनाला माहिती मिळाली की हे सगळे सगळे या प्रकरणात गुंतले आहेत, तेव्हा परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयास्पद होती”, असे वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे .

Anil Deshmukh
अनलॉक करण्याची घाई नको; 7 जिल्ह्यांना जास्त काळजी घेण्याची गरज

तसेच आज सकाळी ईडीने देशमुख यांच्या नागपुरातील जीपीओ चौकातील निवासस्थानीही छापा टाकला आहे त्यासाठी गुरूवारी रात्रीच ईडीचे पथक मुंबईहून नागपुरात दाखल झालं होतं. दरम्यान चॊकशीतून सत्य समोर येईलच आणि त्यासाठी तपास यंत्रणेला माझ पूर्ण सहकार्य असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com