महाराष्ट्रातील वर्धा येथे पुलावरून कार पडल्याने सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

पीएम मोदींनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची भरपाई जाहीर केली आहे.
Accident
AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले यांच्यासह 7 विद्यार्थी वर्ध्याला जात असताना सेलसुराजवळील पुलावरून कार पडून मृत्यूमुखी पडले. एसपी वर्धा प्रशांत होळकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री 11.30 वाजता घडली. या अपघातात वाहनाचे पूर्ण नुकसान झाले आहे. वाहनाची स्थिती पाहून अपघाताची तीव्रता कळू शकते. पीएम मोदींनी (Narendra Modi)अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची भरपाई जाहीर केली आहे.(Maharashtra Latest News)

हे सर्व विद्यार्थी सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती मिळाली आहे. नीरज चव्हाण, अविष्कार रहांगडाले, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युष सिंग, शुभम जैस्वाल आणि पवन शक्ती अशी मृतांची नावे आहेत. रहांगडाले हे तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Accident
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कमी, मुंबईतील संक्रमणाची गती मंदावली

गाडीवरील ताबा सुटून सेलसुराजवळील नदीवरील पुलावर आदळून हा अपघात झाला. चारचाकी पुलावरून खाली पडली. या अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. देवळीहून वर्ध्याकडे येत असताना सेलसुराजवळ हा भीषण अपघात झाला. मृताचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्या व्यक्तीने एका प्राण्याला वाचवण्यासाठी बळजबरीने स्टेअरिंग फिरवले होते, त्यामुळे कार अनियंत्रितपणे खड्ड्यात पडली. हा अपघात इतका भीषण होता की सर्व विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा हा अपघात झाल्याची माहिती मिळाली मात्र अपघाताच्या वेळी मोठा आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com