RSS Headquarter : रा. स्व. संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन; बॉम्बशोध पथकाकडून शोधमोहीम
RSS Headquarter
RSS Headquarter Dainik Gomantak
Published on
Updated on

RSS Headquarter : नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला महाराष्ट्रातील नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची बॉम्बची धमकी मिळाली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबतचा फोन आला होता. या फोननंतर आरएसएस मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

RSS Headquarter
Mohan Bhagwat : RSS च्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी भागवत सोमवारपासून गोव्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी एक वाजता पोलिस नियंत्रण धमकीचा कक्षात फोन आला. कॉल करणाऱ्याने नागपुरच्या महाल भागातील आरएसएसचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली आहे. माहिती मिळताच बॉम्बशोधक पथकाची टीम घटनास्थळी पोहोचली. टीमसोबत श्वान पथकही आहे. आरएसएस मुख्यालयाच्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. मुख्यालयाच्या कॅम्पसबाहेर गस्त वाढवण्यात आली आहे. जवळपास राहणाऱ्या लोकांवरही नजर ठेवली जात आहे. धमकीचा फोन कोणत्या क्रमांकावरून मिळाली याचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

RSS Headquarter
Amit Shah On ITBP: वर्षाच्या शेवटी अमित शहांचं मोठं वक्तव्य, 'भारत-चीन सीमेची चिंता नाही कारण...'

संघ मुख्यालय परिसरात आधीपासूनच कडक सुरक्षाव्यवस्था तैनात असते. सीआरपीएफची तुकडी येथे तैनात आहे. तर नागपूर पोलिस देखील तैनात असतात. RSS मुख्यालय परिसरात व्हिडिओग्राफी आणि ड्रोनवरही बंदी आहे. दरम्यान, या आधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लखनौ येथील 2 आणि कर्नाटकातील 4 कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यानंतर गुन्हाही नोंद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com