ओवेसी हे तर भाजपचे 'अंडरगार्मेंट', सामनातून सेनेची खरमरीत टीका

ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यूपी निवडणुकीच्या निमित्ताने जात, धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी सर्व तयारी केली आहे : सामना
They are  undergarment of BJP, Shivsena attacks on Asaduddin Owaisi
They are undergarment of BJP, Shivsena attacks on Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आगामी विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढवणाऱ्या एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर शिवसेनेने (Shivsena) जोरदार हल्ला चढवला आहे. ओवेसी भाजपचे (BJP) 'अंडरगार्मेंट' आहे असे म्हणत सेनेनं ओवेसींना टार्गेट केले आहे. त्याचबरोबर असदुद्दीन ओवैसी भाजपला पडद्यामागून मदत करत आहेत असा आरोप देखील केला आहे.(They are undergarment of BJP, Shivsena attacks on Asaduddin Owaisi)

शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रात एका लेखात 'यूपी विधानसभा निवडणुका होईपर्यंत काय पाहावे लागेल हे माहित नाही. भाजपच्या यशस्वी वाटचालीचे शिल्पकार मियां असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचा पक्ष चमकदार काम करत असल्याचे दिसते. ओवैसी यांनी यूपी निवडणुकीच्या निमित्ताने जात, धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी सर्व तयारी केली आहे.' असे लिहीत उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी ओवेसींना टार्गेट केले आहे.

ओवेसींच्या नुकत्याच झालेल्या लखनौ भेटीचा संदर्भ देत शिवसेनेने म्हटले की, प्रयागराजहून राजधानीकडे जात असताना काही समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आतापर्यंत यूपीमध्ये अशा घोषणा दिल्या जात नव्हत्या, पण ओवेसींनी जाऊन प्रक्षोभक भाषणे दिली, त्यानंतर पाकिस्तान जिंदाबाद सारख्या घोषणा सुरू झाल्या आहेत. आणि हे धोकादायक असल्याचे सामनामध्ये सांगण्यात आले आहे.

They are  undergarment of BJP, Shivsena attacks on Asaduddin Owaisi
कोण आहेत आनंदराव अडसूळ? का होतीय ईडीची चौकशी

तिहेरी तलाक कायद्याचा संदर्भ देत शिवसेनेने 'मियां ओवैसी या कायद्याला विरोध करणाऱ्या धर्मांध नेते, मुल्ला आणि मौलवींच्या मागे उभे राहिले. अशा परिस्थितीत ओवैसी मुस्लिमांच्या कोणत्या अधिकार आणि न्यायाबद्दल बोलत आहेत? मुस्लिमांचे राजकारण कोणताही राष्ट्रवाद असू शकत नाही.मुस्लिम हे या देशाचे नागरिक आहेत आणि त्यांनी देशाच्या संविधानाचे पालन करून स्वतःचा मार्ग काढला पाहिजे. ज्या दिवशी ओवेसी हे सांगण्याचे धैर्य मिळवतील, त्या दिवशी ते देशाचे नेते म्हणून ओळखले जातील, अन्यथा त्यांच्याकडे फक्त भाजपची कॉर्सेट म्हणून पाहिले जाईल.' असा सल्लाही ओवेसींना दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com