'प्रवरानगर सहकार अंदोलनाची काशी': अमित शहा

प्रवरानगरमध्ये देशातील पहिल्या सहकार परिषदेसाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा उपस्थित आहेत.
Amit Shah

Amit Shah

Dainik Gomantak 

Published on
Updated on

महाराष्ट्रातील मागील काही दिवसांपासून राजकीय समीकरणे बदलत असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. अमित शहा यांचा ग्रामीण महाराष्ट्रातील हा पहिलाच दौरा आहे. अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असल्याने राज्यातील आणि देशातील राजकारणाला वळण देणारे कोणते मुद्दे मांडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. प्रवरानगरमध्ये होत असलेल्या देशातील पहिल्या सहकार परिषदेसाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा उपस्थित आहेत.

अमित शहा म्हणाले, ज्या भूमीवरुन स्वराज्य स्थापनेची कार्यशिला रोवली गेली त्या भूमीवर मी आज आलो आहे. ज्ञानेश्वारांनी पसायदान लिहून विश्व कल्याणाचा मार्ग या अवघ्या विश्वाला दाखवून दिला. शिवरायांना अभिवादन करत मी भाषणाची सुरुवात करत आहे.

शहा पुढे म्हणाले, ''प्रवरानगरच्या भूमीवर देशात सहकारीतेची बीजे रोवली गेली. देशातील सहकार क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या लोकांनी जरुर प्रवरानगरच्या भूमीला भेट दिली पाहिजे. गुजरातमध्येही अमूलच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला नवी कलाटणी मिळाली.''

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
केंद्रीय मंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर

तसेच शहा म्हणाले, धनंजयराव गाडगीळ (Dhananjayrao Gadgil), वैकुंठभाई मेहता यांनी खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला उभारी दिली. सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशातील पहिले सहाकर मंत्रायल सुरु केले. सहकार क्षेत्राला पुन्हा एकदा जीवदान देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या योजनांची अमंलबजावणीही सुरु केली आहे.

त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये पारदर्शकता येत्या काळात आणावी लागणार आहे. तसेच तरुणांचा सहभाग सहकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये वाढवावा लागणार असल्याची बाबही अमित शहांनी यावेळी बोलताना नमूद केली. सहकार क्षेत्रामध्ये हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले याचे अवलोकन करावे लागणार आहे. महाराष्ट्राने सहकार क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे आपली भूमिका निभावली हे कौतुकास्पद आहे. आर्थिक क्षमता कमी असल्यामुळेच सहकार क्षेत्राची गरज भासत आहे. प्रवरानगर ही खऱ्या अर्थाने सहकार अंदोलनाची काशी आहे. आगामी काळात आम्ही सहकार विद्यापीठाची स्थापना करणार आहोत. त्याचबरोबर येणाऱ्या काळात मोदी सरकार सहकार नितीही आणणार आहोत. सहकार क्षेत्रामध्ये महिला, तरुणांना जोडण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत, असही अमित शहा यांनी यावेळी बोलताना म्हटले.

<div class="paragraphs"><p>Amit Shah</p></div>
गृहमंत्री अमित शाह आज बेळगावात ; महाराष्ट्र एकीकरण समितीची भेट नाकारली

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ज्या धरतीवर सहकाराची बीजे रुजली त्याच भूमीवर देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शहा आले आहेत. सहकाराची खरी-खुरी जाणीव आहे त्यांनाच पंतप्रधान मोदी यांनी अमित शहांना सहकारमंत्री बनवले. पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यानंतर सहकार क्षेत्राचे काय होणार? असे अनेक प्रश्न विरोधकांनी उपस्थित केले. अमित शहा हे सहकार चळवळीतून तयार झालेले नेते आहेत. सहकारमंत्री होताच अमित शहा यांनी साखर कारखान्यांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर एमएसपी लावल्यानंतरच कारखानदारांचे आणि शेतकऱ्यांचे भले झाले. इथेनॉलसंदर्भात अमित शहांनी मोठे निर्णय घेतले. तसेच अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रीगटाने इथेनॉलसंबंधी अनेक निर्णय घेतले. अमित शहा सहकारमंत्री झाल्यापासून खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राचे दिवस पालटले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com