Amruta Fadnavis: नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता, अमृता फडणवीस यांचे वक्तव्य

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली.
Amruta Fadnavis
Amruta FadnavisDainik Gomantak
Published on
Updated on

‘आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे आणि नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला आहे. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता यांनी उत्तरे दिली. पंतप्रधान मोदींना राष्ट्रपिता असल्याचे सांगत वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्याचा आरोप वकिलांकडून अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांच्यावर करण्यात आला. यावर त्यांनी उत्तर दिले.

Amruta Fadnavis
Panaji: स्मार्ट पणजीसाठी थोडा त्रास सहन करावाच लागेल; मंत्री बाबूश मोन्सेरात

अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरूप न्यायालयात वकील अजेय गंपावार यांनी आठ पानांचे आरोपपत्र सादर केले. या प्रकरणी अभिरूप न्यायालयातील न्यायमूर्ती ॲड. कुमकुम सिरपूरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. सुनावणीत अमृता फडणवीस यांनी आपली बाजू स्वत: मांडत दिलखुलासपणे आरोप उधळून लावले तर काही आरोप मान्यही केले. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

Amruta Fadnavis
IIT: सांगे नाहीतर मग कोठे होणार IIT? काय म्हणाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

"मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. माझ्या वक्तव्यावर राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे नेते ट्रोल करत असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. " असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com