Breaking News: महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळेच्या घंटा वाजणार

त्यामुळे पुन्हा एकदा मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadDainik Gomantak

महाराष्ट्रातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. मुलांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी टास्क फोर्सने काही सूचना देखील दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु करण्यासंबंधी या सूचनाही टास्क फोर्सने दिल्या आहेत. तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एसएओपी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागामध्ये आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना दिली.

महाराष्ट्र शिक्षण विभागाने राज्यातल्या सर्व शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे chief minister पाठवला होता. गेल्या काही महिन्यापासून शाळा सुरु होण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरु होत्या. मात्र, अद्यापपर्यंत मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करायला परवानगी दिली नव्हती. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटे येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव लांबणीवर गेला.

Varsha Gaikwad
Breaking News: दिल्लीला नरिमन पॉंईंटशी जोडण्याचं गडकरींचं स्वप्न

मात्र मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून राज्यातल्या सर्व शाळा पुन्हा सुरु केल्या जातील. राज्यात शाळा बंद झाल्यानंतर मागेच पूर्ण वर्ष आणि त्यानंतर नव्या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत आॅनलाईन शिक्षण सुरु झाले होते. ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा होत्या.

असे असतील नियम:

  • मुले ऑनलाइन ऑफलाइन दोन्ही शिक्षण घेऊ शकतात

  • ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी शाळा सुरु

  • शहरी भागात आठवी ते बारावी वर्ग सुरू

  • शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन केल्याशिवाय परवानगी देण्यात येणार आहे.

  • निवासी शाळा बाबत अजून निर्णय नाही

  • ऑनलाइन वर्गदेखील सुरू राहतील

  • प्रत्येक आरोग्य केंद्राशी कसे जोडता येईल यासाठी प्रयत्न सुरू

  • विद्यार्थ्यांच्या हजेरी बाबत पालकांची संमती असेल

  • प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा बंधनकारक नसतील

  • परीक्षा देत असताना पालकांची संमती घेणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com