Shiv Sena: शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव, तर ठाकरे गट आता 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'

Eknath Shinde And Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून शिवेसेनेतील बंडाळीमुळे गाजत आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील राजकारण मागील काही दिवसांपासून शिवेसेनेतील बंडाळीमुळे गाजत आहे. यातच आता अंधेरी पूर्व मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'मशाल' हे चिन्ह मिळालं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Patra Chawl land scam case: संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 17 ऑक्टोबरपर्यंत वाढ

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक शिंदे आणि ठाकरे गटासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे. शिवसेना (Shiv Sena) आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. शिवसेनेने येथून पत्नी ऋतुजा यांना तिकीट दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत पराभूत झालेले मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याचा शिंदे गट आणि भाजपचा (BJP) डाव आहे. पक्षाचे चिन्ह आणि नावावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही गोठवले होते.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Patra Chawl land case: संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने बजावले समन्स

त्याचवेळी, निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या चिन्हाचे तीन पर्याय नाकारले आहेत. मात्र, पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाच्या पक्षाचे नाव 'बाळासाहेबांची शिवसेना' असे असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com