गणपतीपुळेचा समुद्र ठरला 'नो स्वीमिंग झोन'

करोनाच्या नियमावलीनूसार तसेच खवळलेल्या समुद्रामुळे किनाऱ्यावर बोटिंग सेवा बंद आहेत, यामुळे जीवरक्षकांना आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही मदत मिळत नाही
Ganpatipule Beach
Ganpatipule BeachDainik Gomantak
Published on
Updated on

भाविकांचे श्रद्धास्थान आणि निसर्ग सौंदर्याने नटलेलं पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणारा गणपतीपुळेचा समुद्र (Ganpatipule Beach) आता जीवघेणा ठरत आहे. गेल्या काही महिन्यात (Month) या ठिकाणी अनेक भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, चार दिवसांपूर्वी अश्याच एका पर्यटकाचा याठिकाणी मृत्यू (Death) झाला तर एकला वाचविण्यात जीवरक्षकांना यश मिळाले आहे. हे दोघे पर्यटक मूळचे सांगली (Sangali) जिल्ह्यातील होते.

Ganpatipule Beach
मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि त्यांचा साखरपुडा राहिला!

ही घटना गांभीर्याने घेत जयगड पोलिस ठाणे, गणपतीपुळे ग्रामपंचायत, आणि देवस्थान समिती यांनी वेळीच उपाययोजना अंमलात आणली आहे, गणपतीपुळे या ठिकाणी सतत होणाऱ्या दुर्घटना थांबवण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. करोनाच्या महामारीमुळे अनेक पर्यटन क्षेत्रे पर्यटनासाठी बंद होते परंतु आता याठिकाणी नागरिकांची गर्दी वाढतेली दिसून येत आहे.

गणपतीपुळे या ठिकाणी नो स्वीमिंग झोन तयार करण्यात आला असून इथं लाल रिबिन बांधण्यात आली आहे. लाल रिबिन बांधलेल क्षेत्र हे पोहणाऱ्यांसाठी धोकादायक क्षेत्र असणार आहे. तसेच किनाऱ्यावर ग्रामपंचयातीतर्फे दहा जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ganpatipule Beach
Monsoon Update: महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार, मुंबईसह मराठवाडा, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

नो स्वीमिंग झोन म्हणजे काय?

भरतीच्या वेळी पाण्यात चाळ तयार होत असते, यामध्ये पर्यटक अडकून बुडतात दरम्यान दरम्यान हे क्षेत्र नो स्वीमिंग झोन म्हणून घोषित करण्यात येते, चाळ तयार होण्याची ठिकाणे सातत्याने बदलत असल्याने नो स्वीमिंग झोन सुद्धा बदलत असतात. सोमवार 20 पासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यावर भरती आहोटीचे वेळापत्रक लावण्यात येणार आहे.

बोटिंग सेवा बंद आल्यामुळे जीवरक्षकांची मोठी कसरत

करोनाच्या नियमावलीनूसार तसेच खवळलेल्या समुद्रामुळे किनाऱ्यावर बोटिंग सेवा बंद आहेत, यामुळे जीवरक्षकांना आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही मदत मिळत नाही, यादरम्यान त्यांची मोठी कसरत होती, शिवाय जीवरक्षकांना डोद्यात तेल घालून लक्षतेवावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com