Monsoon Update: महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार, मुंबईसह मराठवाडा, विदर्भाला अतिवृष्टीचा इशारा

स्कायमेट वेदरने23 सप्टेंबरपर्यंत मुंबई आणि मुंबईच्या उपनगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.(Monsoon Update)
Monsoon Update: Heavy rain in Maharashtra
Monsoon Update: Heavy rain in Maharashtra Dainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे (Maharashtra Rain). स्कायमेट वेदरने (Sky mate Weather) 23 सप्टेंबरपर्यंत मुंबई (Rain In Mumbai) आणि मुंबईच्या उपनगरी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल रात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला.आणि आता पश्चिम किनारपट्टी भागात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईतील पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची परिस्थिती निर्माण होईल. स्कायमेटशी संबंधित तज्ज्ञ महेश पलावत यांनी सांगितले की काल रात्री सांताक्रूझ परिसरात 71 मिमी पाऊस पडला असून लोअर परळमध्येसुद्धा सकाळी जोरदार पाऊस झाला आहे .(Monsoon Update: Heavy rain in Maharashtra)

स्कायमेट तज्ञ महेश पुलावट यांनी अंदाज वर्तवला आहे की मान्सून केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कायम राहील. यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील धरणातील पाण्याची पातळी वाढली असून नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार 23 सप्टेंबरनंतर हवामान स्वच्छ होईल. पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय मान्सूनमुळे 23 सप्टेंबरपर्यंत पाऊस पडेल. स्कायमेटच्या मते, पाऊस अधून मधून असेल, सतत पाऊस पडणार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.असे देखील सांगितले आहे.

Monsoon Update: Heavy rain in Maharashtra
Monsoon Update:मुंबईत जोरदार पाऊस तर देशभरात वरुण राजा लावणार हजेरी

महाराष्ट्रातील विदर्भ आणि मुंबई भागात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावर एक चक्रीवादळ परिसंचरण विकसित होत आहे. तो जसजसा तीव्र होईल तसतसा महाराष्ट्रात आणखी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. याची सुरवात सर्वप्रथम विदर्भात पाऊसापासून होईल. जरी ते मुख्यतः राज्याच्या उत्तर भागाला पूर्व ते पश्चिम कव्हर करेल, परंतु काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. यानंतर, पालघर, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील पाऊस पडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com