ठाकरे सरकार हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करतयं: आमदार नितेश राणे

भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे.
MLA Nitesh Rane & Uddhav Thackeray
MLA Nitesh Rane & Uddhav ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यात (State) आगामी गणेशत्सवाच्या पाश्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली आहे. गणेश मंडळांना ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्याव लागत आहे, याबाबत राज्यपाल कोश्यारी यांना माहिती दिली आहे. या भेटीनंतर राणे यांनी माध्यमांशी बोलताना, हिंदू बहुसंख्यांकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी ठाकरे सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले करत आहे. बेस्ट, मेट्रोच्या कार्यक्रमामध्ये कोरोनाचा सावट राज्य सरकारला दिसत नाही का ? ” अशी विचारणा देखील नितेश राणे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

MLA Nitesh Rane & Uddhav Thackeray
शिवसेनेकडून 'गटारी' निमीत्त भन्नाट ऑफर; स्वस्त दरात विकले चिकन

राणे पुढे म्हणाले, मेट्रोच्या कार्यक्रमामध्ये झालेली तूफान गर्दी दिसत नाही, कालच पार पडलेल्या बेस्टच्या कार्यक्रमात स्वतःहा मुख्यमंत्री हजर होते त्यावेळी त्यांना कोरोनाची माहिती नव्हती का? नेत्यांच्या पार्ट्या चालतात त्यावेळी त्यांना कोरोनाचे नियम लक्षात राहत नाही का? पुण्यात खुद्द अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते तेव्हा त्यांना कोरोनाच लक्षात राहिलं नव्हत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. ज्या ज्या वेळी हिंदूचे सण येतात त्या त्यावेळी सरकारला राज्यावर कोरोनाचं सावट असल्याचे दिसते. मुंबईमध्येही हीच अवस्था आहे.”

MLA Nitesh Rane & Uddhav Thackeray
महाराष्ट्र भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी आम्ही बोललो आहे, गणेशउत्सवानिमित्त होर्डिंग लावण्यात आले आहेत त्या होर्डिंगवर गणशमंडळांची आर्थिक गणिते मांडलेली असतात त्या होर्डिंगवर देखील बंदी घातली आहे. होर्डिंग लावल्यानंतर राज्यात कुठला कोरोना पसरतो आणि या लोकांना कोणत्या डॉक्टरने सांगितले आहे? याचं उत्तर राज्य सरकारने आम्हाला द्यावे. छोट्या आरत्या विकण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

MLA Nitesh Rane & Uddhav Thackeray
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत भाजपचा धुव्वा

शिवाय, मी काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट करत म्हटले होते की, हिंदू खतरे मे है, अशी परिस्थिती बंगामध्ये होती. तशाच प्रकारची परिस्थिती आता आपल्या राज्यात निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com