मुंबई: आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या उपक्रमांना सुरुवात केली आहे. असेच काहीसे वातावरण मुंबईतील (Mumbai) वसई विरार मतदार संघात दिसु लागले आहे. सोमवार पासुन श्रावण मास सुरु होतोय, त्यामुळे गटारीचे आयोजन अनेक ठिकाणी केले जाते. हीच गोष्ट हेरुन विरारच्या साईनाथनगरमध्ये शिवसेनेने सवलतीच्या दरात चिकन चिकन विक्रीचा फलक लावलेला आढळला आणि हा विषय चर्चेचा ठरला. या जाहिरात फलकाने या उपक्रमाबद्दल सर्वत्र चांगली चर्चा सुरू केली आहे. (Shiv Sena offers to sell chicken at cheaper rates in mumbai)
राजकीय पक्ष आपल्या प्रचारासाठी काय करतील याचा अंदाज न लावलेलाच बरा. याचाच प्रत्यय मुंबईत आला. शिवसेनेच्या विरार-साईनाथ नगर शाखेतर्फे एक किलो चिकन 180 रुपये दराने विक्रीची भन्नाट ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली आहे. रविवारी गटारी अमावास्येच्या निमित्ताने 180 रुपये किलोने चिकण विक्रीचा कार्यक्रम आयोजित केला. सध्या बाजारात चिकनची किंमत 240 ते 260 रुपये किलो आहे त्यामुळे ही ऑफर फायद्याची ठरणार आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या काळात महानगरपालिका निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.