भीषण परिस्थिती! पावसामुळे महाराष्ट्रात आतापर्यंत 102 जणांचा बळी

महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत 102 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात पावसामुळे आतापर्यंत 102 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी एका अहवालामध्ये ही माहिती दिली आहे. 1 जुलै ते 14 जुलै दरम्यान मुसळदार पावसामुळे झालेल्या जिवीतहानीचा अहवाल आहे. बुलढाणा, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पूर, वीज पडणे, भूस्खलन आणि झाडे पडणे यासह पावसाशी संबंधित घटनांमध्ये 102 जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. (Terrible situation 102 people have died in Maharashtra so far due to rain)

Monsoon Update
महाराष्ट्रात 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, गळा आवळून केली हत्या

राज्यातील अनेक गावांना पावसाचा फटका बसला आहे

अहवालानुसार, महाराष्ट्रातील 20 गावे अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत आणि किमान 3,873 लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जवळपास आठवडाभर कोकणात मध्य महाराष्ट्रात दडी मारल्यानंतर शनिवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

बीएमसी एसओपी बनवेल

शहरात संततधार पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बीएमसीला दिले आहेत. यानंतर, गुरुवारी झालेल्या बैठकीत, नागरी प्रशासक आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी नागरी अधिकाऱ्यांना बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या सहकार्याने एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com