Hindustan Petroleum Refinery

Hindustan Petroleum Refinery

Dainik Gomantak

रिफायनरीतून रासायनिक पावडर मिसळल्याचा संशय!

हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) रिफायनरीतील काही पावडर त्यांच्या खाद्यपदार्थांवर (food) आणि वाहनांवर पडत असल्याचे समोर आले आहे.
Published on

मुंबई: माहुल गावात राहणाऱ्या लोकांच्या खाद्यपदार्थ आणि वाहनांवर रिफायनरीतून संशयास्पद रासायनिक पावडर पडली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन (Fire brigade) अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

चेंबूर उपनगरातील माहुल गावातील गव्हाण पाडा येथील रहिवासी घराबाहेर सण साजरा करत असताना ही घटना घडली. जवळच असलेल्या हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) रिफायनरीतील काही पावडर त्यांच्या खाद्यपदार्थांवर (food) आणि वाहनांवर पडत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आल्याचे अधिकारी यांनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Hindustan Petroleum Refinery</p></div>
महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अमित शाह पुण्यात

गावातील नागरिकांनी तत्काळ स्थानिक पोलीस (Police) आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दल, पोलीस आणि BMC घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ रिफायनरी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्लांटच्या अधिकाऱ्यांना तेथे काम थांबवण्यास सांगण्यात आले.

रविवारी पहाटे दीड वाजेपर्यंत अग्निशमन दल, पोलीस (Police) आणि BMC चे कर्मचारी या परिसरात उपस्थित होते. आणि त्यांना काहीही संशयास्पद आढळले नाही. काही वेळाने संशयित रासायनिक पदार्थ स्वतःहून पडणे बंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

RCF पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी घावटे यांनी सांगितले की, हा विषारी पदार्थ नव्हता. या घटनेनंतर, प्लांट अधिकाऱ्यांना तात्पुरते काम थांबवून समस्या सोडवण्यास सांगण्यात आले. कारखाना निरीक्षक आणि रासायनिक प्रदूषण नियंत्रक यांच्या अहवालाची आम्ही वाट पाहणार आहोत आणि गरज पडल्यास त्याआधारे कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com