Supriya Sule : उत्तराधिकारी ठरले! NCP च्या कार्याध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल; गोव्याची जबाबदारी पटेलांकडे

NCP Foundation Day: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आता दोन कार्याध्यक्ष असतील. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या जवळचे खासदार प्रफुल्ल पटेल हे नवे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील.
Supriya Sule And Prafulla Patel
Supriya Sule And Prafulla PatelDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापनदिनी पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. पवारांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड जाहिर केली.

सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाने पंजाब आणि हरियाणाची जबाबदारी दिली आहे. तर पटेल यांच्याकडे गोवा, मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. काही काळापूर्वी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या दबावाखाली त्यांनी राजीनामा मागे घेतला होता.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत विरोधी पक्षांच्या एकतेवर भर देताना सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल, असे सांगितले. ते म्हणाले, "मला खात्री आहे की या देशातील जनता आम्हाला मदत करेल. 23 जूनला आपण सर्वांची बिहारमध्ये बैठक होत आहे. आम्ही चर्चेनंतर एक कार्यक्रम आणू आणि देशभर फिरून तो लोकांसमोर मांडू.

Supriya Sule And Prafulla Patel
Madhya Pradesh Election: इथं निवडणुकीवेळी गोळ्या झाडल्या जातात, कमकुवत उमेदवारांनी तिकीट मागू नये; विरोधी पक्षनेत्याचे वादग्रस्त विधान

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे.

पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे.

या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार." राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

Supriya Sule And Prafulla Patel
Election Commission: निवडणूक आयोग करणार ‘ईव्हीएम’ तपासणी

शरद पवार हे राजकारणातील अनुभवी नेते आहेत. ते प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक उचलतात. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पवारांनी पक्षातील तिकीट वाटपाचा मार्ग आधीच साफ केला आहे.

पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाच्या वेळी विजयाच्या क्षमतेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल, असे पवार यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com