मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी शिवसेना आक्रमक

गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून होत आहे.
Subhash Desai
Subhash DesaiDainik Gomantak

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्ट्राकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. याच पार्श्वभुमीवर राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज केंद्रीय सांस्कृत‍िक मंत्री जी किशन रेड्डी (G. kishan Reddy) यांची भेट घेतली.

महाराष्ट्रमध्ये (Maharashtra) कुसुमाग्रज यांची जयंती ही ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशीही मागणी यावेळी मंत्री देसाई यांनी केली आहे. यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यासह अन्य अधिकारी सुध्दा उपस्थित होते.

Subhash Desai
महाराष्ट्रातील जनतेला लवकरच कोरोनाच्या निर्बंधातून दिलासा

मंत्री सुभाष देसाई यांनी मराठी भाषा ही अभिजात भाषा का आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका आणि निवेदनही दिले. कुसूमाग्रजांच्या जयंती निमित्त साजरा केला जाणा-या ‘मराठी भाषा गौरव दिना’लाच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला आनंद होईल, असे देसाई यावेळी म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतचे सर्वच निकष, अटींचे पालन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याचे यावेळी जी किशन रेड्डी यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचेही मंत्री रेड्डी यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जनअभियानाचे रूप आले आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यामातूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारे पत्र महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून पाठविली जात असल्याची माहितीही यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com