Kankavli : कणकवली तालुक्यातील केनेडी बाजारपेठेत शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. हा राडा 24 जानेवारीला झाला होता. दोन्ही बाजूचे आक्रमक कार्यकर्ते कणकवलीतील केनेडीत एकमेकांच्या कार्यालयांवर चालून गेले होते.
यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या राडा प्रकरणातील तीन गुन्ह्यात दोन्ही पक्षाच्या १० कार्यकर्त्यांना कणकवली पोलिसांनी मध्यरात्री 2 वाजता ताब्यात घेतले होते. तसेच या राड्यात आमदार वैभव नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे.
भाजपा कार्यालयात जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण, त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
तसेच या कालावधीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस काम करत असताना धक्काबुक्की करत अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गटाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी सुमारे तीस जणांवर गुन्हा दाखल केला हाेता.
राड्यात शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले होते. सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचे समजताच आमदार वैभव नाईक हे देखील गावात पाेहचले. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना थाेपविण्यासाठी प्रयत्न केला हाेता.
यावेळीचा आमदार नाईक यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एक दांडा हातात घेऊन आमदार वैभव नाईक हे भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने जात असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. या राड्यात आमदार नाईक यांच्यावर देखील गुन्हा दाखल आहे.
यावर आमदार नाईक यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले, "पोलिसांकडून मला कोणतीही नोटीस बजावली गेलेली नाही. आपण कामानिमित्त बाहेर असून पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहे. पोलीस अटक करतील तेव्हा अटक करून घेणार" असल्याची प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी एका वृत्तपत्राला दिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.