....अखेर एस टी चा संप मिटला !

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु होता. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
S.T.

S.T.

Published on
Updated on

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील काही दिवसांपासून गाजत आहे. मात्र आता एसटी कर्मचारी आणि राज्य शासन यांच्यात तोडगा निघाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. मागील तब्बल 54 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. दरम्यान, कर्मचाऱ्यांना पगार हा वेळेवर देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने मान्य केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीकरणाचा मुद्दा हा समितीच्या अहवालानुसारच मान्य करण्यात येईल असं देखील राज्य परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर कामावर परतल्यानंतर राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली कारवाई मागे घेतली जाईल अस देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी उद्यापासून कामावर परतावे तसेच बाहेरुन मुंबईत आलेल्या कर्मचाऱ्यांनी परवापासून कामावर रुजू व्हावे.

<div class="paragraphs"><p>S.T.</p></div>
एस टी कर्मचारी आक्रमक; परिवहन मंत्र्यांच्या घरावर फेकली शाई

अजय गुजर यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, एसटी कर्मचाऱ्यांनी कोणताही अनुचित प्रकार संपादरम्यान केला नाही. विलीनीकरणाच्या मुद्यावर बोलताना समितीचा जो काही निर्णय येईल तो राज्य शासन आणि एसटी कर्मचाऱ्यांना मान्य असणार आहे. मात्र एसटीच्या विलीनीकरणावर आम्ही आजही ठाम आहोत. संपादरम्यान मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना योग्य तो मोबदला दिला जाईल. त्याचबरोबर कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नियमानुसार मोबदला देण्यात येणार आहे. तसेच राज्य शासनाने वेतनवाढीवर विचार करण्याचे देखील आश्वासन दिले आहे. राज्यातील परिस्थिती जाणिव ठेवून आम्ही संप मागे घेत आहोत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात येणार असल्याचे देखील राज्य शासनाने मान्य केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com