Sindhudurg: मोलमजुरी करून घरी जात होत्या महिला, मद्यधुंद चालकाच्या डंपरने दिली धडक; 1 ठार, 4 जखमी

घरी जाणाऱ्या पाच महिलांना मागून जोरदार धडक दिली. यात एका महिलाचा मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
Sindhudurg
SindhudurgDainik Gomantak
Published on
Updated on

सिंधुदूर्ग मध्ये अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. मालवणमध्ये गुरूवारी सायंकाळी मोलमजुरी जाणाऱ्या महिलांसोबत मोठा अपघात झाला. काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला.

मद्यधुंद चालकाने भरधाव डंपर महिलांच्या अंगावर घातला, घरी जाणाऱ्या पाच महिलांना मागून जोरदार धडक दिली. यात एका महिलाचा मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Sindhudurg
PM Modi Mumbai Visit: काँग्रेसकडून पंतप्रधानांचा 'बादशाह मोदी' असा उल्लेख...

रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय 65, रा. काळसे रमाईनगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचा नाव आहे.

या भीषण अपघातात रुक्मिणी विठोबा काळसेकर (वय 55), अनिता चंद्रकांत काळसेकर (55), प्रमिला सुभाष काळसेकर (40), प्रज्ञा दीपक काळसेकर (35) असे जखमी झालेल्या चार महिलांची नावे आहेत. जखमी महिला रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Sindhudurg
Vande Bharat Express: साई भक्तांना मिळणार 'वंदे भारत'ची भेट, PM मोदी दाखवणार ग्रीन सिग्नल

पोलिसांनी चंदगड येथील डंपर क्र. (एमएम 46 एफ 0827) च्या चालकाला ताब्यात घेतले आहे. चालक मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या अपघाताची माहिती मिळताच काळसे गावातील रहिवासी पोलिस उपिनिरीक्षक नितीन कदम आणि पोलिस पाटील विनायक प्रभू, राजेंद्र परब, अण्णा गुराम, प्रमोद काळसेकर यांच्या सह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. नितीन कदम यांनी मालवण पोलिस स्थानकात दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली आणि 108 रुग्णवाहिका बोलावून उपस्थितांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com