''राज ठाकरेंसमोर झुकलं ठाकरे सरकार, लाऊडस्पीकरच्या वापरावर घातली बंदी

राज्याच्या गृह विभागाने सोमवारी सांगितले की, मशिदींतील लाऊडस्पीकरचा वापर धार्मिक स्थळांना योग्य परवानगीनेच वापरावा लागेल.
Loud Speaker
Loud SpeakerDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार केल्यानंतर, राज्याच्या गृह विभागाने सोमवारी सांगितले की, मशिदींतील लाऊडस्पीकरचा वापर धार्मिक स्थळांना योग्य परवानगीनेच वापरावा लागेल. (Speakers may not be placed in front of mosques without the permission of the State Home Department)

Loud Speaker
शिवसेना आमदाराच्या पत्नीचा घातपात का आत्महत्या?

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse-Patil) हे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांसोबत बैठक घेऊन सर्व पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांना या संदर्भात निर्देश देण्याचे निर्देश देणार असल्याचे अशी माहिती समोर येत आहे.

राज्यात सुरू असलेल्या लाऊडस्पीकर विषयाच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे यांनी रविवारी सांगितले की, देशातील मुस्लिमांनी हे समजून घेतले पाहिजे की "धर्म कायदा आणि देशाच्या वर नाही" तसेच त्यांना मशिदींमधून लाऊडस्पीकर काढून टाकण्यास देखील सांगितले आहे.

"आम्हाला महाराष्ट्रात दंगली नको आहेत, नमाज पठण करण्यास कोणीही विरोध केलेला नाहीये. मशिदींमध्ये लावलेले आणि देशभरात बेकायदेशीर असलेले लाऊडस्पीकर काढून टाकावेत, एवढीच आमची इच्छा आहे. कायद्यापेक्षा धर्म मोठा नाही हे मुस्लिमांनी समजून घ्यायला हवे. 3 मे नंतर बघेन काय करायचं ते, असं ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.

Loud Speaker
...म्हणून अमरावतीच्या अचलपूर शहरात 144 कलम लागू

मनसे प्रमुखांनी हिंदूंना "3 मे पर्यंत थांबा" अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात सांगितले आहे. ते म्हणाले की, "मला भारतभरातील हिंदूंना 3 मे पर्यंत थांबण्यास सांगितले आहे. आणि त्यानंतर, अशा सर्व मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवा, जे लाऊडस्पीकर खाली करत नाहीत," असंही राज ठाकरे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com